शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रूळावर स्कुटी आडवी घालत शिक्षिकेने अडविली रेल्वे

By admin | Updated: June 26, 2016 00:38 IST

श्रीगोंदा : गेटमनने लवकर रेल्वे गेट का बंद केले? असा वाद घालत एका बेभान शिक्षिकेने रेल्वे रूळावर स्कुटी आडवी लावत चक्क नांदेड-पुणे ही पॅसेंजर अडविली.

श्रीगोंदा : गेटमनने लवकर रेल्वे गेट का बंद केले? असा वाद घालत एका बेभान शिक्षिकेने रेल्वे रूळावर स्कुटी आडवी लावत चक्क नांदेड-पुणे ही पॅसेंजर अडविली. ही घटना लोणीव्यंकनाथ ते पारगाव सुद्रिक रोडवर गेट क्रमांक ११ वर मंगळवारी (२१) सकाळी घडली. मात्र, याबाबत रेल्वेचे शाखा अभिंयता ज्ञानेश्वर देशमुख यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २४) रात्री उशीरा तक्रार नोंदवली आहे. घटनेनंतर संबंधीत महिला पसार झाली असून स्कुटीच्या क्रमांकावरून पोलीस तपास करत आहेत. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास नांदेड-पुणे ही पॅसेंजर रेल्वे बेलवंडी स्टेशनवरून सुटल्यानंतर शिर्के नावाच्या गेटमनने लोणीव्यंकनाथ ते पारगाव सुद्रिक दरम्यान असणारे गेट (क्रमांक ११) बंद केले. यावेळी श्रीगोंद्याकडून एम. एच. १६, बी. ई. ७२६ या क्रमांकाची स्कुटीवरून एक शिक्षिका आली. त्यांनी गेटमन शिर्केला गेट लवकर बंद का केले, असे म्हणत धमकावले. तसेच पाहता-पाहता चक्क रेल्वे रुळावर स्कुटी आडवी लावली आणि स्वत:ही रुळावर उभी राहिली. त्यानंतर रेल्वे कशी पुढे जाते?असे म्हणत शिर्केला दम भरला. यावेळी अन्य प्रवाशांनी या शिक्षिकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेभान शिक्षिकेने आपला तमाशा थांबवला नाही. अखेर शिर्के यांनी बेलवंडी स्टेशनला संदेश पाठवला. यामुळे नांदेड-पुणे पॅसेंजर दहा मिनिटे थांबवण्याची वेळ आली. मात्र रेल्वे थांबताच ती शिक्षिका दुचाकी काढून घेत तेथून पसार झाली. शिर्के यांनी पॅसेंजरला हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २४) रात्री उशीरा रेल्वेचे शाखा अभिंयता देशमुख यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. (तालुका प्रतिनिधी)