शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा ऐकून शिक्षक लागला रडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:16 IST

विद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला सक्तमजुरी

अहमदनगर : विद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  दिगंबर दत्तात्रय ढोंबे (वय २७ रा. केडगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी दिगंबर ढोंबे हा वांबोरी (ता. राहुरी) येथील एका खासगी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस होता. १६ डिसेंबर २०१६ रोजी त्याने विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ही बाब मुलीच्या नातेवाइकांना समजली, तेव्हा त्यांनी ढोंबे याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबाबत तपास करून पोलीस निरीक्षक बालाजी शेगेंपल्लू यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण यासह विविध कलमांतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी व विविध शिक्षात एकूण ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी ढोंबे याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावताच तो न्यायालयात ढसाढसा रडू लागला.पीडित मुलीची साक्ष

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.माने यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तपासी अधिकारी व पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यामुळे या शिक्षकाला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर