- भाऊसाहेब येवलेराहुरी (जि. अहमदनगर) : एका मंत्र्यांच्या पीएच्या शिक्षक पत्नीसाठी आठवड्याचे पाच दिवस बससेवा सुरू असल्याची माहिती लोकमतच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे शनिवार, रविवारी ही बस बंद ठेवत असल्याने वांगीतील गावकरी संतापले आहेत.राहुरी ते पाथरे या २५ किलोमीटरसाठी १० वर्षांपासून बससेवा सुरू आहे़ मंत्र्यांच्या पीएच्या शिक्षक पत्नीची गैरसोय नको म्हणून दोन महिन्यांपासून ही बस पुढे वांगी गावापर्यंत (ता़ श्रीरामपूर) धावत आहे. मॅडमना शनिवारी सकाळची शाळा असते तर रविवारी सुटी असल्याने दोन दिवस बस वांगी येथे जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रविवारीही बस राहुरीकडे निघाली. त्यामुळे वांगीतील प्रवाशांनी बस अडवत जाब विचारला. हा व्हिडिओही ‘लोकमत’ला मिळाला आहे.>बस कोणा एका प्रवाशासाठी सुरू केलेली नाही; परंतु बस शनिवारी, रविवारी पुढे का गेली नाही, याचा जाब चालक, वाहकाला विचारला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. - विलास गोसावी,स्थानकप्रमुख, राहुरी
मंत्र्यांच्या पीएच्या शिक्षक पत्नीसाठी धावते बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:12 IST