तळेगाव दिघे विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य एच.आर. दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, बी.सी. दिघे, तुकाराम सोळसे, हरित सेना प्रकल्प प्रमुख सुनील दिघे, सुधाकर जगताप, संजय आर. दिघे, मच्छिंद्र कासार, अतुल कदम, गोरख दिघे, संभाजी सुर्वे, संदीप देशमुख, भाऊसाहेब दिघे, माणिक पाचोरे, अंगणवाडीसेविका आसमा शेख उपस्थित होते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वड, लिंब, फायकस, वेळूसहित विविध वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
या निमित्ताने सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन बी.सी. दिघे यांनी केले. सुनील दिघे यांनी आभार मानले.
फोटो : तळेगाव दिघे :
विद्यालयात वृक्षारोपण करताना, सरपंच बाबासाहेब कांदळकर, प्राचार्य एच.आर. दिघे, समवेत पदाधिकारी व शिक्षक दिसत आहेत.