शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या विद्यापीठ उपकेंद्रातून एका दिवसात टीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:33 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याअहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शनिवारी प्रत्यक्ष काही विद्यार्थ्यांना या दाखल्यांचे वाटप झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस् कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रजनिश बार्नबस, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. बाळासाहेब सागडे होते. उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले. यापूर्वी टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना ३० दिवस वाट पहावी लागत होती. तसेच आॅनलाईन अर्जामध्ये चुकीचा पत्ता किंवा पोस्टातून कागदपत्रे मागे गेली तर विद्यार्थ्यांना पुण्याला जावे लागत. परंतु ही सुविधा नगर उपकेंद्रात झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च वाचणार आहे. तसेच ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना नगर उपकेंद्रात एका दिवसात मिळणार आहेत, अशी माहिती उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठAhmednagarअहमदनगर