श्रीरामपूर: बेलापूर-राहुरी रस्त्यावरील नरसाळी गावाजवळ टेम्पोच्या धडकेने मोटारसायकलवरील पतीचे गंभीर मार लागल्याने दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. तर पत्नी जखमी झाली. याबाबत दहा दिवसांनी टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १८ मे रोजी फिर्यादी पत्नी ज्योती विजय आहेर व त्यांचे मयत पती विजय सूर्यभान आहेर हे आळंदीहून वैजापूरकडे एम. एच. १४ बी जी ३३९८ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात होते. नरसाळी गावाजवळ राहुरीकडे जाणार्या टेम्पोने (क्रमांक एम. एच. १७ के. ५१९५)ने मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. यात विजय आहेर गंभीर जखमी होऊन श्रीरामपूरला उपचारासाठी नेत असतानाच मरण पावले. तर पत्नी ज्योती या गंभीर जखमी होत्या. फिर्यादीवरुन टेम्पो चालक नामदेव रंगनाथ नागले याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सुधीर पाटील तपास करीत आहेत.
टेपोच्या धडकेत पती ठार; पत्नी जखमी
By admin | Updated: May 29, 2014 00:27 IST