शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

‘तनपुरे’चा बॉयलर कोण पेटविणार?

By admin | Updated: June 15, 2016 23:45 IST

सुधीर लंके, अहमदनगर राहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला.

सुधीर लंके, अहमदनगरराहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला. या कारखान्याची चावी मतदार कोणाच्या हाती सोपविणार याची जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. ‘तनपुरे’च्या निवडणुकीवर पुढची बरीच राजकीय समीकरणे ठरणार आहेत. दिवंगत डॉ. बाबुराव तनपुरे यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. गावोगावी फिरुन त्यांनी कारखान्यासाठी भागभांडवल जमा केले. महिलांनी स्वत:चे दागिने या कारखान्यासाठी विकले. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरताना बाबुरावांच्या अशा अनेक आठवणी जागोजागी ऐकायला मिळतात. पण, राहुरीच्याच नेतेमंडळींना हा भरभक्कम वारसा नीट जपता आला नाही. ज्या कारखान्याने राज्यात कधीकाळी उच्चांकी भाव दिला, त्या कारखान्यावर आज ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा आहे. कारखान्याच्या निवडणुकीत प्रसाद तनपुरे, शिवाजी गाडे व शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांची ‘एकता’ एक्सप्रेस धावली. प्रवरेच्या डॉ. सुजय विखेंच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळ व सेवानिवृत्त कामगार आयुक्त सुभाषचंद्र येवले यांच्या नेतृत्वाखालील उत्कर्ष मंडळ असा तिरंगी सामना आहे. तीनही मंडळांनी प्रचारात कारखाना सुरू करण्याचा दावा केला आहे. प्रसाद तनपुरे व शिवाजी गाडे हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढले. पण, राहुरीवर विखे यांचे बाह्य आक्रमण होत आहे, या मुद्यावर ते आता एकत्र आले. कारखाना जगविण्यापेक्षा त्यांना विखे यांची चिंता मोठी दिसते हे त्यांच्या भाषणांवरुन जाणवले. प्रसाद तनपुरेंऐवजी अरुण तनपुरे व प्राजक्त तनपुरे यांच्याकडे प्रचाराची बरीचशी सूत्रे होती. अरुण तनपुरे यांनी बाजार समितीचे मॉडेल यशस्वी केले आहे. तेच आता कारखानाही सुरळीत करतील, असे ठसविण्याचा प्रयत्न झाला. सुजय विखे हेही प्रचारात आक्रमक दिसले. ते राजकारणात नवीन आहेत. पण त्यांची भाषणे मुरब्बी राजकारण्यासारखी होती. अजित पवारांनी या मंडळींना मैदानात उतरविले आहे. आता कारखाना सुरु करायला निघालेली ही मंडळी इतके दिवस कोठे होती? हा प्रश्न त्यांनी राहुरीकरांना केला. सत्ता द्या, लगेच सभासदांची व कामगारांची देणी देऊन बॉयलर पेटवितो, असे त्यांनी जाहीरच केले.खासगी कारखाना चालतो मग सहकार कसा मोडीत निघतो, असा मुद्दा मांडत राधाकृष्ण विखे यांनी थेट ‘प्रसाद शुगर’ वर हल्ला केला. सुभाषचंद्र येवले यांनीही सर्वसामान्य शक्तीचा एक तिसरा पर्याय उभा केला. रायगड बँकेच्या माध्यमातून पैसा आणून आपण कारखाना सुरु करु, असा त्यांचा दावा आहे. राहुरीची ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित नाही म्हणूनच ती एवढी गाजली. राहुरीकरांच्या भांडणात यापूर्वी त्यांच्या हातून आमदारकी निसटली. आता कारखानाही आपल्या हातून जाणार, याची त्यांना भिती आहे. सुजय विखे हे नगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुभाष पाटील यांनी तसे राहुरीच्या सभेत जाहीरच करुन टाकले. त्यामुळे सुजय यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने बांधणी सुरु केलीय, असे म्हणण्यास वाव आहे. राहुरी कारखाना ताब्यात आला तर हा मतदारसंघच विखे यांच्या ताब्यात येणार आहे. त्यामुळेच राहुरीचे स्थानिक नेते धास्तावले आहेत. अर्थात सभासदांना आपले-बाहेरचे यापेक्षा कारखाना जगणे व उसाला भाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते कोणाला बॉयलर पेटविण्याची संधी देणार, हे गुरुवारी ठरेल. कर्डिले नेमके कोणाचे?आमदार शिवाजी शिवाजी कर्डिले यांच्या टोपीखाली दडलेय काय? याचा अंदाज कोणालाच येत नाही. या निवडणुकीतही त्यांनी धूर्तपणा केला. ‘जो जिंकेल त्याच्या पाठिशी मी राहणार’ असा भिंतीवरील तसबिरीत दिसणाऱ्या स्वामींसारखा अजब पवित्रा त्यांनी घेतला. कोणीही जिंका रिमोट माझ्याकडे राहणार, असे त्यांना ठसवायचे आहे. अर्थात ते खरोखरच तटस्थ आहेत की आतून कोणाला रसद पुरविणार, हे लवकरच स्पष्ट होईल. राहुरी कारखान्याला पात्रता नसताना जिल्हा बँकेने एवढे कोट्यवधीचे कर्ज कसे दिले? या मुद्याचा कर्डिले यांनी निवडणुकीत खुलासा करायला हवा होता. रामदास धुमाळ यांच्याकडेही ‘तनपुरे’ची सत्ता होती. मात्र, ते प्रचारात अलगद बाजूला राहिले.