शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यावर भरतात टँकर : वनकुटेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:41 IST

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसराला पाणी पुरवठा करणारे टॅँकर उद्भवाऐवजी (वावरथ जांभळी) वनकुटे येथील शेततळ्यातूनच अस्वच्छ पाणी भरत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.

भिकाजी धुमाळटाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसराला पाणी पुरवठा करणारे टॅँकर उद्भवाऐवजी (वावरथ जांभळी) वनकुटे येथील शेततळ्यातूनच अस्वच्छ पाणी भरत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.पारनेर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने मुळा नदीतील वावरथ जांभळी येथून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु वावरथ जांभळी ते टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या, कान्हूरपठार, तिखोल, वडगाव सावताळ या गावांपर्यंत भरलेले पाण्याचे टँकर आणण्यासाठी टॅँकरचा खर्च वाढतो. पैशाची बचत करण्यासाठी जवळजवळ ५० टक्के टँकर वावरथ जांभळी ऐवजी वनकुटे येथील शेततळ्यात भरले जातात. शेततळ्यातील पाणी अत्यंत अस्वच्छ आहे. त्यामुळे गावागावात अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. वनकुट्यातून टॅँकर भरल्याने किमान २५ किमी अंतर कमी होते. त्यामुळे टॅँकर मालकांना हजार ते दीड हजार रूपयांचा फायदा होतो. वनकुटे परिसरातील तब्बल चार ते पाच शेततळ्यातून पाण्याचे टँकर भरले जातात. प्रशासन याकडे डोळेझाक करते.शेततळे मालक कमावतो प्रतिदिन ५० हजार रुपयेपहाटेपासून ते सायंकाळपर्यंत किमान टॅँकरच्या १०० खेपा भरल्या जातात. एक टँकर भरण्यासाठी ५०० रूपये घेतले जातात. अशा प्रकारे प्रतिदिन एका शेततळ्याचा मालक ५० हजार रुपये दिवसाला कमावतो, अशी माहिती शेततळ्याच्या मालकाने दिली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर