शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरती संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: March 17, 2016 23:42 IST

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने यावर्षी घेतलेल्या तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका उमेदवाराच्या जागेवर डमी उमेदवार बसविण्यात आल्याची तक्रार झाली आहे.

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने यावर्षी घेतलेल्या तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका उमेदवाराच्या जागेवर डमी उमेदवार बसविण्यात आल्याची तक्रार झाली आहे. या उमेदवाराला जे प्रवेशपत्र देण्यात आले त्यावरील छायाचित्रही अत्यंत अस्पष्ट आहे. त्यामुळे असे प्रकार अन्य उमेदवारांबाबतही घडले आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे. तलाठी भरतीसाठी गत १३ सप्टेंबरला परीक्षा झाली. या भरतीतून निवड झालेल्या काही उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. मात्र, एका उमेदवाराबाबत प्रशासनाला निनावी तक्रार प्राप्त झाली आहे. या उमेदवाराने आपल्या भावाला डमी म्हणून परीक्षेला बसविले. विशेष म्हणजे हा उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला नियुक्ती मिळणार आहे. या उमेदवाराचे प्रवेशपत्र ‘लोकमत’च्या हाती आले असून त्यावर उमेदवाराचे छायाचित्र हे अत्यंत अस्पष्ट असल्याने या संशयाला पुष्टी मिळत आहे. भरतीसाठी प्रशासनाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. उमेदवाराचे छायाचित्र अस्पष्ट असताना ते कसे स्वीकारले गेले? परीक्षागृहात पर्यवेक्षकाने या बाबीला आक्षेप का घेतला नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. हे एक उदाहरण समोर आले असले तरी आता निवड झालेल्या अन्य उमेदवारांचे अर्ज व प्रत्यक्षात परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे तपासून खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तक्रार झालेल्या उमेदवाराने मूळ अर्जावरच डमी उमेदवाराचे छायाचित्र दिल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)तलाठी भरतीत एका उमेदवाराबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या उमेदवाराचे प्रवेशपत्र संशयास्पद आहे. त्याबाबत चौकशी सुरु असून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. -हेमलता बडे, तहसीलदार, महसूल विभाग.