शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

घ्या..बंधू..पाणी घ्या..!

By admin | Updated: September 24, 2016 00:10 IST

अहमदनगर : डोक्यात जाळीदार पांढऱ्या शुभ्र टोप्या. पांढरा कुर्ता, पायजमा. दाढी. अन् दंडाला कोपर्डी घटनेच्या निषेधदर्शक काळ्या पट्ट्या बांधलेल्या.

अहमदनगर : डोक्यात जाळीदार पांढऱ्या शुभ्र टोप्या. पांढरा कुर्ता, पायजमा. दाढी. अन् दंडाला कोपर्डी घटनेच्या निषेधदर्शक काळ्या पट्ट्या बांधलेल्या. अशा पेहरावातील तरुण नगरच्या कोठला बसस्थानकाजवळील राज चेंबर्ससमोर उभे होते. असंच चित्र पोस्टासमोर. नगरमधील मराठा क्रांती महामोर्चासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला ‘घ्या...बंधू...पाणी घ्या’, म्हणत हे तरुण पाण्याचे पाऊच पुढे करीत होते.मोर्चा मराठा समाजाचा असला तरी त्यांची तहान भागविण्याचं काम शुक्रवारी नगरमधील मुस्लीम समाजाचे तरुण करताना दिसत होते. या तरुणांच्या सोबतीला लहान मुले व काही ज्येष्ठही होते. कोठला येथे अजिजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी थंडपाण्याचे जार या ठिकाणी रांगेत ठेवले होते. शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यातील मोर्चेकरी स्टेट बँक चौकातून पोस्टासमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे वाडिया पार्ककडे जात होते. त्यांच्यासाठी पोस्टासमोर मुस्लीम युवकांच्या युवा क्रांती ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याचे पाऊच वाटप केले जात होते. समीर बागवान, मोहसीन शेख, आयूब खान, सरफराज बागवान, अन्सार शेख, नजीर शेख आदी तरुण पाणी देत होते. बुथ रुग्णालयाच्या थोडे पुढे अहमदनगर सोशल क्लबचा मंडप होता. तेथे नईम सरदार, शेख मोमीन,जावेद अल्ताफ,अन्वर सय्यद, सय्यद नाजीर, आर्किटेक्ट फिरोज, इम्रान बागवान, शकूर शेख, मोहसीन पहेलवान,जावेद शेख, आदिल सय्यद, अल्तमाश जरीवाला, अब्दूल सत्तार बागवान, डॉ. साहील अहमद पाणी देत होते. सकाळी याठिकाणी नाश्ताही देण्यात आला. (प्रतिनिधी)