शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा घ्या, वीज द्या; मनसेचे अभिनव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 15:35 IST

शेवगाव : भारनियमनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवारी महावितरणच्या कार्यालयात ‘कोळसा घ्या, वीज द्या’ असे अभिनव आंदोलन करीत उपकार्यकारी ...

शेवगाव : भारनियमनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवारी महावितरणच्या कार्यालयात ‘कोळसा घ्या, वीज द्या’ असे अभिनव आंदोलन करीत उपकार्यकारी अभियंता रुपाली पवार यांना कोळसा भेट दिला.कोळसा नाही म्हणून भारनियमन केले जाते असे ‘महावितरण’कडून सांगितले जाते. महावितरण कार्यालयाने वर्षभराची वीज निर्मितीची गरज व आपत्कालीन गरज लक्षात घेऊन विशेषत: आॅक्टोबर महिन्यात सुरु होणा-या कृषी ग्राहकांची वीज मागणीची वाढ लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक होते. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे राज्यात भारनियमन करावे लागत आहे. सध्या शालेय परीक्षा, सणांचे दिवस असताना विद्यार्थ्यांबेराबर नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो, असे मनसेने उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांना मागणी नुसार वीज पुरवठा करावा, अशी मागणी करीत मनसेच्यावतीने अधिका-यांना कोळशाचा बॉक्स भेट देऊन कोळसा घ्या पण वीज द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली़ येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयात ‘मनसे’ स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, मनविसेचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, शहर उपाध्यक्ष बाळा वाघ, संदीप देशमुख, राजेंद्र साळुंके, मंगेश लोंढे, सुनील काथवटे, दिनेश तेलोरे, कांतीलाल जैस्वाल, महेंद्र घनवट, जालिंदर कवळे, आशितोष शिरसाठ, अक्षय साळुंके, आनंद मगर आदी उपस्थित होते.