शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वाढीव जनावरे छावणीत घ्या ; शेतक-यांचे तहसीलदार कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:07 IST

शासनाने दुष्काळात शेतक-यांचे पशुधन वाचविण्याच्या हेतूने नगर तालुक्यात छावण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने छावण्यात शेतक-यांची नवीन जनावरे दाखल होत आहे.

केडगाव : शासनाने दुष्काळात शेतक-यांचे पशुधन वाचविण्याच्या हेतूने नगर तालुक्यात छावण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने छावण्यात शेतक-यांची नवीन जनावरे दाखल होत आहे. मात्र प्रशासन या जनावरांना छावण्यात घेण्यास परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. चा-याअभावी जनावरांचा पोटमारा होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. छावणीत नवीन जनावरे घेण्यास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी करत तालुक्यातील शेतक-यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात बैठे आंदोलनास सुरुवात केली असून तहसीलदारांकडून परवानगी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे.तालुक्यातील शेतक-यांनी बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. दुष्काळात चारा व पाणीटंचाईमुळे शेतक-यांच्या जनावरांना छावण्यांचा मोठा आधार मिळाला. ज्या शेतक-यांकडे चारा उपलब्ध होता. त्यांची जनावरे दावणीलाच होती. मात्र पावसाने मारलेली दडी अन चाराच संपल्याने छावणीबाह्य असलेली दावणीतील जनावरे मोठया संख्येने छावणीत दाखल होत आहेत. नवीन जनावरांना छावणीत घेण्यास प्रशासन परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. घरचा चारा संपला, परवानगीअभावी शासनाचाही चारा मिळेना अशा अवस्थेत जनावरांचा पोटमारा होत आहे. आमची जनावरे छावणीत घेण्यास तत्काळ परवानगी अशी मागणी होत असून प्रशासकीय अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलक शेतक-यांनी केला आहे. तालुक्यातील वाळकी, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुई छत्तीशी सह अन्य गावातील शेतक-यांकडे चारा उपलब्ध असल्याने रुई छत्तीशी सह अन्य गावातील शेतक-यांकडे चारा उपलब्ध असल्याने छावणी बाह्य जनावरांची संख्या मोठी होती. पावसाने दिलेला ताण आणि दावणीचा चारा संपल्याने नवीन जनावरे छावणीत येत आहेत. मात्र परवानगी शिवाय या जनावरांना चारा मिळत नाही. अधिका-यांच्या परवानगी शिवाय छावणीचालक नवीन जनावरे छावणीत घेण्यास तयार होत नाहीत.दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांचा पोटमारा होऊ नये म्हणून शासनाने छावण्या सुरु केल्या. मात्र अधिका-यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जनावरांची उपासमार होत आहे. नवीन जनावरांना छावणीत घेण्यास व तत्काळ चारा देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी मागणी केली. आंदोलनात बाजार समितीचे उपसभापती रेवननाथ चोभे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, सुधीर भापकर, उध्दव कांबळे, गोरख काळे, प्रशांत जाधव, दत्ता काळे, गणेश हराळ, शहाजी कुताळ, तुषार चोभे, बाबासाहेब काळे, विजय काळे आदींसह शेतकरी सहभागी झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय