शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

By admin | Updated: February 18, 2016 23:25 IST

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे.

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणेच बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. या प्रभागाचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी ‘स्वच्छ प्रभाग’ हा आपला अजेंडाच ठरविला आहे. नगर शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेत नगर मागे पडले आहे. यावर लोकसहभागाने मात करण्याचा प्रयत्न काही प्रभागांनी सुरू केला आहे. प्रभाग २१ मध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनी घरोघर जाऊन नागरिकांना कचरा ‘डस्टबिन’मध्येच टाकण्याचे आवाहन केले. घरोघर हे डस्टबिनही वाटण्यात आले. प्रभागात होणारे हळदी-कुंकू, शिक्षक दिन, पाडवा मैफल, गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध समारंभात व उत्सवात प्रभागाची स्वच्छता हा विषय अजेंड्यावर असतो. त्याचे फळ आता दृष्टिपथास येऊ लागले आहे. प्रभागातील धनगरगल्लीत स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ शिंदे बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे बालोद्यान देखील कचरामुक्त बनले आहे. घुमरे गल्ली, चित्रा गल्ली, कोर्ट गल्लीतील रस्ते करताना त्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे पालकत्व नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागात वृक्षांची वाढ होऊ लागली आहे. हे वृक्ष भविष्यात प्रभागाच्या वैभवात भर टाकणार आहेत. वृक्षारोपण करताना लावलेले ट्री गार्ड चोरीस गेले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम नागरिकांनी सुरूच ठेवली. आता प्रभाग स्वच्छ दिसू लागल्याने आपण ‘स्वच्छ प्रभाग’ साकारु शकतो हा आत्मविश्वास येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छतेची स्वयंशिस्तच लागली आहे. नागरिक आता घरातील कचरा रस्त्यावर अथवा घराबाहेर टाकत नाहीत. दुसऱ्यांनाही टाकू देत नाहीत. स्वच्छता कर्मचारी न आल्यास नागरिक थेट त्याला दूरध्वनी करून बोलावून घेतात. नगरसेवकांनाही फोन करून सांगतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी दांडी मारण्याचे धाडस करत नाही. प्रभाग क्रमांक २१ हा शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत पसरलेला आहे. बाजारपेठेत दिवसभर गजबज असली तरी रस्त्यावर मात्र कोठेच कचरा दिसत नाही. नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यात यश मिळाले आहे. पूर्वी नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचे. मात्र डस्टबिन दिल्यापासून रस्त्यावरील कचरा डस्टबिनमध्ये पडू लागला. डस्टबिन दिल्यामुळे प्रभाग स्वच्छतेला हातभार लागला आहे. शिवाय साफसफाई कर्मचाऱ्यांकडून झाडलोट झाल्याची माहिती घेतो. कोणाची तक्रार आली तर पुन्हा झाडलोट करण्यास पाठवितो. नागरिक व झाडलोट करणाऱ्या दोघांनाही आता स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे.- किशोर डागवाले, नगरसेवक.