शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सुवर्णमहोत्सवी अमरतिथी सोहळा : काही क्षणात मेहेरबाबांच्या समाधीस्थळी पसरली निरव शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:58 IST

देश - विदेशातील लाखो मेहेरप्रेमींची मेहेर टेकडीवर गर्दी उसळली होती.

केडगाव : देश - विदेशातील लाखो मेहेरप्रेमींची मेहेर टेकडीवर गर्दी उसळली होती. पावणे बाराच्या सुमारास मेहेरधून गाण्यात आली आणि बरोबर १२ च्या ठोक्याला सारी मेहेरटेकडी मौनाने शांत झाली. सुमारे १५ मिनीटे मेहेरबाबांच्या समाधीस्थळी निरव शांतता पसरली. वा-याची झुळुकही काही क्षण शांत झाली. लाखों भाविकांच्या गर्दितही मेहेर टेकडी भक्तीभावाने निशद्ब झाली.अरणगाव ( ता. नगर ) येथील अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी सुवर्ण महोत्सवी ( ५० वी )अमरतिथी सोहळा सुरू आहे. आजच्याच दिवशी ३१ जानेवारी १९६९ रोजी बांबानी देहत्याग केला होता. या निमित्ताने मेहराबाद (अरणगाव)येथे सुमारे ५५ हजार भाविकांनी आज मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळून आपली आध्यात्मिक भावना व्यक्त केली.बुधवारपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी सुमारे ४० हजार भाविक बसतील असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्तही जेथे जागा मिळेल तेथे भाविक बसून होते. सकाळी साडेअकरा वाजता श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज सकाळी ७ वाजता मुख्य मंडपात प्रेममिलन कार्यक्रम सुरु झाला. तो उशिरापर्यत चालू होता. आजही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या. जगातील ७० देशातून व भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत. देश-विदेशातील मेहेरप्रेमीनी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केले.स्वच्छतेचा आणि एकात्मतेचा संदेश जगभरमेहेरबाबा यांच्या समाधी स्थळी जवळपास ७४ देशातील भाविकांसह देशभरातुन सुमारे दीड लाख भाविक अमर तिथी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. इतक्या संख्येने भाविक व त्यांची वर्दळ असुनही साधा कागदाचा तुकडा व कुठला कचरा ही कुठे दिसत नाही. बाबांचे भक्त टेकडीवरील सर्व स्वच्छता करून आंतरराष्ट्रीय एकात्मतेचे संदेश यामुळे जगभर गेला आहे .

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर