शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पडकई घोटाळ्यात अधीक्षक ब-हाटे निलंबित : आदिवासी योजनेत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:58 IST

अकोले तालुक्यातील पडकई जमीन घोटाळा प्रकरणात नगरचे तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : अकोले तालुक्यातील पडकई जमीन घोटाळा प्रकरणात नगरचे तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कृषी विभागाने हा निलंबनाचा आदेश काढला आहे. याप्रकरणात कृषी विभागाचे इतर अधिकारी व आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांवरही ठपका आहे.आदिवासी शेतक-यांच्या डोंगर उतारावरील जमिनी सपाट करुन त्या लागवडीलायक बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. आदिवासी विकास विभागाच्या २०१५ च्या शासन निर्णयानुसार २०१६ मध्ये नगर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. मात्र, योजनेतील नियमांचे पालन न करता व आदिवासींना अनुदान न देता जळगाव येथील सर्वोदय शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेला कुठलीही निविदा न काढता हे काम देण्यात आले. तसेच योजनेच्या ३ कोटी २४ लाख अनुदानापैकी १ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले गेल्याचे निदर्शनास आले होते.यासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत नगरचा कृषी विभाग व याच जिल्ह्यातील राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये हा अहवाल वरिष्ठांना सादर झाल्यानंतर आजपर्यंत त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने गत १ नोव्हेंबररोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ब-हाटे यांच्या निलंबनाचा आदेश कृषी विभागाने काढला आहे. भाऊसाहेब तापकीरे, भाऊसाहेब सोनवणे, डॉ. अजित नवले यांनीही याबाबत शासनाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल केलेल्या आहेत.या प्रकरणातील सर्वच दोषींवर कारवाई व्हावी, अशी तापकीरे यांची मागणी आहे. निलंबित झालेले बºहाटे हे सध्या गोंदिया येथे कृषी अधीक्षक म्हणून कार्यरत होते.जिल्हाधिका-यांच्या अहवालात गंभीर आक्षेपअपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी या प्रकरणी चौकशी अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ला प्राप्त झाला आहे. व्यक्तिगत लाभाची योजना असताना योजनेच्या अंमलबजावणीसाठी जळगावच्या संस्थेची निवड करण्यात आली. निविदा न काढता हे काम दिले गेले. संस्थेस आगाऊ रक्कम दिली. योजनेची प्रसिद्धी न करता संस्थेने लाभार्थ्यांशी संपर्क करुन प्रकरणे तयार करुन घेतली. लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत असे आक्षेप अहवालात नोंदविण्यात आलेले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत १९ मार्च २०१६ च्या बैठकीला कृषी अधीक्षक उपस्थित नसतानाही त्यांना बैठकीला उपस्थित दाखविले. या इतिवृत्तावर अधीक्षक बºहाटे यांनीही स्वाक्षरी केली, ही बाबही चौकशीत समोर आली आहे. आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी ए.पी. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली असल्याने तेही अडचणीत सापडले आहेत.जळगाव येथील संस्थेला काम देण्याबाबत विद्यमान सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नगरच्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पत्र पाठविले होते, असाही आरोप आहे. हे पत्र प्रशासनाकडे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संस्थेने धुळे, नंदूरबार, जळगाव येथे कामे केली असल्याचाही उल्लेख शासकीय अहवालात आहे. त्यामुळे तेथे संस्थेने कोणती कामे केली व ती नियमानुसार आहेत का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिका-यांनी जळगाव येथील संस्थेला कार्यारंभ आदेश देण्याबाबत आदेश दिलेला आहे. त्यानुसार कृषी विभागाने कार्यवाही केली. आपली काहीही चूक नाही. निलंबनाबाबत शासनाकडे दाद मागू. - भाऊसाहेब ब-हाटे, कृषी अधीक्षक.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय