शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, सहकार विभाग करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST

मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे.

- सुधीर लंके 

अहमदनगर : मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी) रावसाहेब वर्पे हे भरतीच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचा मुलगाच परीक्षार्थी असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली. सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधु व सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी त्याची दखल घेत चौकशीचा आदेश दिला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांसह संघटनांच्या तक्रारींचीही चौकशी केली जाणार आहे. नाशिकचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी सोमवारी हा स्थगिती आदेश काढला. लिपिक, ज्युनिअर आॅफिसर, अधिकारी पदांच्या ४६४ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. ‘नायबर’ संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. भरतीची अंतरिम यादीही बँकेने शनिवारी प्रसिद्ध केली. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर उमेदवारांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्याचा बँकेने निर्णय घेतला.स्थगिती आदेशात ‘लोकमत’चा संदर्भनाशिकचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी काढलेल्या स्थगिती आदेशात ‘मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. या बातमीतील तपशील आदेशात नमूद करण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँक