शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित मानेंना निलंबित करा : शिवाजी कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:27 IST

जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी करत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्याकडे केली.

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी करत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्याकडे केली.पंचायत राज समिती गुरुवारी अहमदनगर दौऱ्यावर आली असता येथील शासकीय विश्राम गृहात कर्डिले यांनी समितीची भेट घेतली़ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली़ ते म्हणाले, जिल्हा परिषदेत माने यांचा मनमानी कारभार सुरू आहे़आरोग्य विभागातील डाटा एन्ट्रीचे एक कोटींचे काम सर्वसाधारण सभेची मंजूरी न घेता वाटप केले, पंचायत समितींतील बेकायदेशीर ठराव, १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बेकायदेशीररित्या हायमॅक्सची खरेदी, निकृष्ट पोषण अहार, देहरा येथील बंधाºयाचे कामात गैरव्यवहार आणि अखर्चित निधीबाबत पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे़ त्यांची इतिवृत्तात नोंद घेण्यात आली आहे़ त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांच्या दबावाखाली माने काम करतत़ चालूवर्षीचा आतापर्यंत फक्त २५ टक्केच निधी खर्च झाला़ निवडणूकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने निधी परत जाईल़ पदाधिकारी व अधिकाºयांची मिलीभगत आहे़ विकास कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत़ मुख्यकार्यकारी अधिकाºयांना विशेष अधिकार असतात़ पण माने त्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे अशा अधिकाºयाला जिल्हा परिषदेत ठेवू नये, त्यांना तातडीने निलंबन करावे, अशी मागणी केल्याचे कर्डिले म्हणाले़पदाधिका-यांमुळेच निधी अखर्चित- कर्डिलेजिल्हा परिषदेतील पदाधिकारी कामे वाटपात हस्तक्षेप करतात़ त्यामुळे कामे देताना अडचणी येत असून, निधी अखर्चित राहातो़ दिलेला निधी खर्च होत नाही़ पदाधिकारी मात्र सरकारकडून निधीच मिळत नाही, अशी उलटी तक्रार करत असल्याची टिका आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांवर केली असून, सदस्यांनाच जबाबदार धरले़पार्श्वभूमी समजून घ्या- शालिनी विखेअखर्चिजत निधीबाबत पत्रकारांनी छेडले असता जिल्हा परिषदेचा निधी खर्च का होत नाही, याची पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे़ विकास कामांच्या निविदा प्रसिध्द केल्यानंतर कमी दराच्या निविदा येतात़ तसेच जीएसटीमुळे अनेक निविदा रद्द करण्याची वेळ आल्याचे अध्यक्षा शालिनी विखे म्हणाल्या़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर