शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

काळे कारखान्याचा मद्यनिर्मिती परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 19:35 IST

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य प्रकल्पावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत दोन साठवण टाक्या विनापरवाना उभारल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. 

ठळक मुद्देउत्पादन शुल्कची कारवाईदोन साठवण टाक्या विनापरवाना

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य प्रकल्पावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत दोन साठवण टाक्या विनापरवाना उभारल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. काळे कारखान्याच्या मद्यनिर्मितीत अनियमितता आढळल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली. यावेळी चार लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकीत साडेचार लाख लिटर साठा आढळून आला. क्षमतेपेक्षा ५० हजार लिटर अधिक स्पिरिट  सापडले. तसेच विनापरवाना दोन साठवण टाक्या उभारल्याचे समोर आले. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. या कारवाईबाबत काळे म्हणाले, कारखान्याच्या मद्याला प्रचंड मागणी आहे. गेल्या हंगामात मद्यप्रकल्प १०९ दिवस चालला. मागील वर्षी ६० लाख २३ हजार बॉक्सची विक्री झाली. पण, विक्रीची किंमत वाढविता न आल्याने उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी झाले. आसवनी व देशी मद्यविभाग शाश्वत करून उत्पन्न वाढविण्याचा विचार आहे. नवीन ३६ कोटींच्या मद्यप्रकल्पाच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. वर्षभरात हा प्रकल्प ३२० दिवस चालेल. त्यातून ८ कोटींची बचत होईल. प्रकल्पाची वाफ साखर कारखान्यास जाणार असल्याने मोठी बचत होणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. ................................................महाराष्टÑात क्रमांक दोनवर खप असलेल्या देशीमद्य प्रकल्पाचा व्यवसाय वाढत असल्याने हितशत्रूंना देखवत नाही. पण, आपला कारभार चोख व स्वच्छ असून कोणतीही अनियमितता नाही. त्यामुळे आलेल्या संकटातून लवकरच बाहेर पडू.- आशुतोष काळे, अध्यक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.