शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 07:01 IST

मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश मनात येऊन मन अस्थिर होते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश मनात येऊन मन अस्थिर होते. तेव्हा त्या मनाला स्थिर करून दु:खमुक्त करायचे असेल तर प्रात:काली उठून मनाने सूर्यस्नान करावे. शुभ चिंतन करावे. सूर्यस्नान केल्यास मन प्रसन्न होण्यास मदत होते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात १० मिनिटे तरी निर्विकार मन करून बसावे. शुभ कल्पना कराव्यात. अरुणोदयाची लाली पाहून सूर्य आगमनाची प्रतीक्षा करावी. सूर्यस्नान, सूर्यनमस्कार मनाला ताजेतवाणे करतात. सूर्याची तेजस्वी किरणे अंगावर येतात तेव्हा चैतन्याच्या लहरी मनात शिरतात. पहाटेची अमृतवलयं आणि त्यात सूर्याची किरणं यांनी मन प्रफुल्लित होत असते. म्हणूनच प्रभू रामचंद्रांपासून अनेकांनी सूर्योपासना केली आहे. मनाची देवता चंद्र आहे,तर सूर्याची देवता बुद्धी. मन आणि बुद्धी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन, बुद्धी आणि आत्मा या त्रिवेणीचा खेळ शरीरावर परिणाम करतो, म्हणून मनाला सुंदर विचार करण्याची सवय लावा. ती शक्ती बुद्धीकडून मिळते. बुद्धीला शक्ती आत्मा देते आणि आत्मा परमात्मा बनण्यासाठी मनाची स्थिती महत्त्वाची असते. मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना करावी. सूर्याची तेजोमयी किरणे मनाचे प्रतिबिंब बदलवतात. त्या किरणांनी मनाची गती बदलते. त्यानुसार त्यातील दूरदृष्टी ठरते. ‘मन’ ही देवता प्रसन्न ठेवायची असेल तर श्रद्धायुक्त अंत:करणाने सूर्यस्नान करा. पूर्वकालपासून ऋषिमुनी-देवी, देवता यांनी सूर्याची स्तुती केली आहे. पांडवांना ‘अक्षयपात्र’ सूर्याने दिले होते. सूर्याची शक्ती मनाला आरोग्य प्रदान करून देते. वेदकालापासून त्याची उपासना केली जाते. मनुष्य जीवनात सूर्य आरोग्य व चंद्र संपत्ती देत असतो. मंगलाचरण करण्यासाठी कायिक, वाचिक, मानसिक ताप घालविण्यासाठी सूर्यसंध्या करा. मनाला चांगले संस्कार देण्यासाठी सूर्योपासना करणे हाही महत्त्वाचा भाग आहे. प्रवृती-निवृत्ती मिश्रित भावना ठेवण्यासाठी, मनुष्याच्या इच्छापूर्तीसाठी सूर्याचे अनुष्ठान करा. सद्गुणांनी युक्त होऊन शुद्ध भावांनी ‘ॐ सूर्याय नम:’ म्हणून १२ वेळा जप करा. आपल्या मनोवृत्तीत बदल होईल. दुष्ट प्रवृत्तीपासून दूर जाऊन मनात सद्भाव तयार होईल. मन उत्तमोत्तम विचार करील.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक