शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुरेगावची सरपंचपदाची निवडणूक स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपद निवडीच्या वेळी बहुमत असलेल्या गटाचे पाच सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे गणसंख्येअभावी निवडीची ...

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपद निवडीच्या वेळी बहुमत असलेल्या गटाचे पाच सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे गणसंख्येअभावी निवडीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एन. बावस्कर यांना तहकूब करावी लागली.

सुरेगाव येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव रोडे, माजी सरपंच सर्जेराव रोडे यांच्या पॅनेलला सात पैकी पाच जागा मिळवून बहुमत मिळाले. मात्र, आरक्षणात सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव निघाले आहे. या पदासाठी दोन सदस्य निवडून आलेल्या डॉ. अनिल मोरे व गुलाब रामफळे, रामकृष्ण रोडे यांच्या पॅनेलच्या मंगल प्रसाद रामफळे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली. मात्र, बहुमत नसल्याने त्यांना पुढील कार्यवाही होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राखीव जागा असल्याने त्यांना सरपंचपद मिळाले तरी बहुमत नसल्याने त्यांना कामकाज चालविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

....

सुरेगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदाचे मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षण असल्याने त्या पदासाठी मंगल प्रसाद रामफळे यांचा अर्ज दाखल होता. मात्र, सरपंच निवडीच्या बैठकीवेळी आवश्यक गणसंख्या नसल्याने सभा तहकूब करण्यात आली. पुढे ज्यावेळी सरपंच निवडीची प्रक्रिया होईल, त्यावेळी मात्र गणसंख्या आवश्यक असणार नाही.

- एम. एन. बावस्कर, निवडणूक निर्णय अधिकारी, सुरेगाव ग्रामपंचायत.