शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यानी धनगर आरक्षणाचा शब्द पाळला नाही : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:36 IST

हळगाव : 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्तेतील भाजपाने सरकार येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे ...

हळगाव : 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्तेतील भाजपाने सरकार येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे अश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. काल चौंडी येथे आल्या असता सुळे बोलत होत्या.सुळे म्हणाल्या, सरकारने धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. गेल्या पाच वर्षांत संसदेत महाराष्ट्रातून सातत्याने धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मी आवाज उठवत आलेली आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे जनतेनेच त्यांचा विचारावं की क्या हुआ तेरा वादा? राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षातील विलनीकरणाचे निराधार वृत्त देऊ नये. काँग्रेसमध्ये विलीणीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी हे नेहमीच पवार साहेबांना भेटत असतात. त्याच रूटींगनुसार भेट गांधी यांनी नुकतीच पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. दरम्यान इव्हिएम मशीन संदभार्तील बोलताना सुळे म्हणाल्या की, जगात बॅलेट पेपरवर निवडणूका होत असताना भारतात इव्हिएम मशीनचा हट्ट धरता कामा नये. जरी मी लोकसभेत इव्हिएम मशीनद्वारे घेतलेल्या निवडणूकीत निवडून आले असले तरी निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या निवास्थानी दोघांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी दोघांचा अहिल्यादेवींची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपा विरूध्द राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष रंगलेला आहे. अश्यातच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी भाजपाच्या मंत्र्यांच्या घरी दिलेली भेट राजकीय निरीक्षकांची भूवया उंचवणारी ठरली. दरम्यान मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी प्रथमच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSupriya Suleसुप्रिया सुळे