कोपरगाव : प्रशासनाच्या कामकाजात प्रसारमाध्यमांची साथ महत्त्वाची असून, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि वृंदावन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मुख्य प्रशासकीय कार्यालयातील तहसील, पंचायत समिती आणि इतर सरकारी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तातील घटत तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंचावर तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. संदीप मुरुमकर, निवासी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, प्रशासनाच्या माध्यमातून अहोरात्र सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची आरोग्याविषयी संवेदनशीलता दाखवून माणुसकीच्या सद्भावनेतून कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्त तपासणी शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कोविड काळात प्रशासनाने केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करून तहसीलदार योगेश चंद्रे यांचे आभार मानले. यावेळी दिवंगत पत्रकार अशोक खांबेकर, छायाचित्रकार रफिक रंगरेज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे, कार्याध्यक्ष युसूफ रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे, सचिव संतोष जाधव, सोमनाथ सोनपसारे, मोबीन खान, लक्ष्मण वावरे, संतोष देशमुख, सिद्धार्थ मेहरखांब, बिपीन गायकवाड, रवींद्र जगताप, अनिल दीक्षित, हेमचंद्र भवर, प्रा. साहेबराव दवंगे यांच्यासह वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे राहुल कापडिया, आदित्य महाजन, तुषार पोळ, कुणाल पवार, महेश सांगळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले.
फोटो०२ - आरोग्य तपासणी शिबिर - कोपरगाव