शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हजारे यांच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीत शोलेस्टाईल आंदोलन, पारनेर तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:27 IST

राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तर राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.

लोकपाल, शेतमालाला हमीभाव अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषण सुरु केले आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ रोज विविध पद्धतीने आंदोलन करीत आहेत. सोमवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.राळेगणसिद्धी येथे तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. अण्णांच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरुन खाली न उतरण्याचा निर्धार १६ तरुणांनी केला आहे. सरकार अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राळेगणचे उपसरपंच लाभेष औटी यांनी केला आहे. रोहिदास पठारे, अरुण भालेकर, प्रभू पठारे, सदाशिव पठारे, रमेश औटी, विलास औटी, महेश अंभोरे, मोन्या फटांगडे, अनिल उगले, बंडू मापारी, प्रशांत औटी, भीमा पोटे, यश मापारी, सुशांत पठारे, अक्षय पठारे, सचिन पठारे आदी कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे