शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:25 IST

तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे

हेमंत आवारीअकोले : तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. दुष्काळाची झळ सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत दिसू लागला आहे. आढळेच्या लाभक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी, वीरगाव, हिवरगाव, गणोरे, वडगाव लांडगा या भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी आहेत. शेततळ्यात साठलेल्या पाण्यातून चारा वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.शिमगा संपताच पिण्याच्या पाण्याची बोंब आदिवासी डोंगरदरीच्या क्षेत्रात सुरु झाली आहे. दोन ठिकाणी टँकर सुरु झाले आहेत. अकोले शहरापासून अवघ्या ५ मैल अंतरावर असलेल्या धामणगाव आवारी या गावासह आढळा धरणाच्या उशाला असलेल्या देवठाणच्या सात वाड्या व कळस येथील मांडवदरा ही आदिवासी वाडी तहानलेली आहे. ३-४ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव महसूल दरबारी दाखल झाले आहेत.आढळा धरणातून चालू रब्बी हंगामात केवळ एकमेव आवर्तन मिळाले. या आवर्तनाने रब्बीच्या पिकांऐवजी चारा जगविण्यासाठी लाभधारकांनी खरी पराकाष्टा केली. पाण्याअभावी रब्बीची पिके करपून गेलीच व आवर्तनाच्या पाण्यातून हिरवागारझालेला चाराही अनेकठिकाणी पिवळा पडला आहे.विहिरींचे तळ उघडे पडल्याने ऊस, घास, मका ही चाऱ्याची पिके जगविण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरु आहे. एकूण शेततळ्यांपैकी १० टक्के शेततळ्यात पाणीसाठा असला तरी देखील तो येत्या आठ पंधरा दिवसातच संपेल. एप्रिलच्या पूर्वार्धापासूनच चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. महसूल प्रशासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अंकुश थोरात, कृष्णकांत थोरात, बाळासाहेब अस्वले, भगवान थोरात, प्रकाश वाकचौरे यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी संपल्यावर पुढे काय?आढळा भागात उजाड होत चाललेल्या शेतीला आता शेततळ्यांचाच आधार उरला आहे. मात्र या शेततळ्यातील पाणी संपल्यावर पुढे काय. शेततळ्यात विकत पाणी टाकायचे, पण कुठून? हा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर