शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संडे अँकर : पक्ष्यांचे घरटे उंचावर; सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:06 IST

हवामान खाते नसताना पक्ष्यांच्या घरट्याचे निरीक्षक करून यंदा किती पाऊस पडेल याचा अंदाज पूर्वी बांधला जायचा.

भाऊसाहेब येवलेराहुरी : हवामान खाते नसताना पक्ष्यांच्या घरट्याचे निरीक्षक करून यंदा किती पाऊस पडेल याचा अंदाज पूर्वी बांधला जायचा. अशी प्रथा आजही सुरूच आहे. यंदा पक्ष्यांनी झाडाच्या उंचावर घरटे बांधले आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळत असल्याची माहिती सडे (ता़ राहुरी) येथील पक्षी घरटे निरीक्षक बापूसाहेब झडे महाराज यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते २७ वर्षांपासून पक्ष्यांचे निरीक्षण करून अंदाज सांगत आहेत़ झडे यांचे अंदाज सहा वेळा चुकीचे ठरले असले तरी २१ वर्ष तंतोतंत खरे ठरले आहेत़झडे महाराज दरवर्षी पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतात़ यंदा पक्ष्यांनी झाडावर शेंड्याच्या खाली व मध्याच्यावर घरटे बांधल्याचे झडे महाराज यांचे निरीक्षण आहे़ मे महिन्यात घरटे बांधण्याचे काम पक्ष्यांकडून सुरू आहे़ पक्ष्यांचे घरटे म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन बांधले जातात, असे शेतकरी मानतात़ त्यामुळे जुने जाणते शेतकरी दरवर्षी पक्ष्यांच्या घरट्यांकडे लक्ष देऊन असतात. झडे महाराज ८० वर्षाचे असून पंढरीचे वारकरी आहेत.पंढरीच्या वारीला जाताना वारकऱ्यांशी चर्चा करताना त्यांना पक्ष्यांच्या घरट्यांचे निरीक्षण करण्याचा छंद लागला़ मे महिन्यात घरटे बांधल्यानंतर आषाढ ते भाद्रपद या महिन्यात पक्षी त्यात अंडे घालतात़ ज्या दिशेने पाऊस येतो त्याच्या विरुद्ध दिशेने पक्षी घरटे बांधतात़ यंदा पक्ष्यांनी उंचावर व पश्चिम बाजूला घरटे बांधले आहेत़ पक्षी पावसापासून बचाव करण्यासाठी विरूद्ध दिशेने घरटे बांधतात, असे झडे महाराज यांचे निरीक्षण आहे़झडे महाराज यांचे निरीक्षण..#शेंड्याच्या खाली घरटे बांधल्यास त्यावर्षी कमी पाऊस पडतो.#झाडाच्या मध्यावर पक्ष्यांनी घरटे बांधल्यास चांगला पाऊस पडतो़#मध्याच्या खाली घरटे बांधल्यास मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत मिळतात़#यंदा पावसाच्या विरुद्ध पश्चिम दिशेला घरटे बांधल्याने सरासरी पाऊस ओलांडणार नसल्याचे संकेत मिळतात़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी