शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव हत्याकांडातील आरोपीची कोठडीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:18 IST

शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी अमोल संतोष उर्फ ईश्वर पिंपळे (वय २१) याने नेवासा पोलीस ठाण्यातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली़

ठळक मुद्दे मध्यरात्री घेतला गळफास मंगळवारी मध्यरात्रीची ही घटना घडली़मयत पिंपळेवर नेवासासह नांदगाव,पिंपळगाव ठाण्यात गुन्हे

अहमदनगर : शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी अमोल संतोष उर्फ ईश्वर पिंपळे (वय २१) याने नेवासा पोलीस ठाण्यातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली़ मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली़ घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे नेवासा येथे दाखल झाले़स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळे याला शेवगाव हत्याकांडप्रकरणी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथून अटक केली होती़ पिंपळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात विविध घटनेत तब्बल अकरा तर नांदगाव व पिंपळगाव (नाशिक) पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत़ विविध गुन्ह्यातील चौकशीसाठी पिंपळे याला नेवासा पोलिसांनी वर्ग करून घेतले होते़ न्यायालयाने त्याला २३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती़ पिंपळे याने मात्र २२ आॅगस्टच्या मध्यरात्री कोठडी क्रमांक तीनमधील इतर कैदी झोपी गेल्यानंतर टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली़ याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ दरम्यान पिंपळे याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईने नेवासा पोलीस ठाणे परिसरात येऊन आक्रोश केला़सीआयडी चौकशीपिंपळे हा शेवगाव हत्याकांडासह अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपी होता़ त्याच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू झाली आहे़ सीआयडीचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक रमेशकुमार गायकवाड यांनी नेवासा पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली़ तसेच सीआयडीचे उपाधीक्षक कृष्णा यादव व हरिभाऊ जाधव यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे़पोलिसांवर निलंबनाची कारवाई ?पिंपळे ज्या कोठडीत होता तेथे त्याच्यासह बारा कैदी होते़ इतर कैदी झोपल्यानंतर पिंपळे याने एकत्र दोन टॉवेल बांधून जाळीला दोर बांधून आत्महत्या केली़ यावेळी ड्यूटीला सुरक्षारक्षक कोण होता़ ठाणे अंमलदार आदींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़