शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुहासभाई मुळे यांचा जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 14:22 IST

अहमदनगर : महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जास्त हुशारी दाखविली तर तुमच्यावर आम्हीच प्रशासक नेमू आणि त्या प्रशासकाचे नाव असेल ‘यमराज’ असा मजकूर असलेली चिट्ठी त्यांना मिळाली आहे. 

अहमदनगर : महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जास्त हुशारी दाखविली तर तुमच्यावर आम्हीच प्रशासक नेमू आणि त्या प्रशासकाचे नाव असेल ‘यमराज’ असा मजकूर असलेली चिट्ठी त्यांना मिळाली आहे. सुहासभाई मुळे यांनी जागरुक नागरीक मंच स्थापन केला आहे. या मंचाद्वारे ते शहरातील समस्यांबाबत नेहमीच जागर करतात. तसेच आंदोलनेही करतात. शहरातील समस्यांवर उपाय सूचविणारे ते उपक्रमही आयोजित करतात. मुळे यांनी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या अनुषंगाने त्यांना धमकी देण्यात आली आहे. तुमची बुद्धी आणि हिम्मत इथे जास्त वापरू नका. असा एकदाच सल्ला आहे. महापालिकेवर जर प्रशासक नेमून आमच्या मागे लागले तर  आम्ही पण तुमच्यावर प्रशासक नेमू आणि त्याचे नाव असेल यमराज, असा मजकूर असलेली चिट्ठी मुळे यांना पाठविण्यात आली आहे. मुळे यांना ही चिट्ठी त्यांच्या घरासमोरील लेटर बॉस्कमध्ये मिळाली आहे. याबाबत मुळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा कोणीतरी खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. मात्र त्याला न घाबरता आपला लढा सुरूच राहील, असे मुळे यांनी सांगितले. महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्याची मागणी ही पक्षातीत असून जागरुक नागरिक मंच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे मुळे यांनी सांगितले.