शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बोधेगावात सलून दुकानावर उसाची ट्राॅली उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हातगाव फाट्यालगत असलेल्या एका सलून दुकानावर ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टरची मागील ...

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हातगाव फाट्यालगत असलेल्या एका सलून दुकानावर ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टरची मागील एक ट्राॅली उलटली. ही घटना बुधवारी (दि.२४) रात्री आठच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र सलून दुकानासह तीन मोटरसायकलींचे नुकसान झाले आहे.

बोधेगाव येथील हातगाव फाट्याला तीव्र चढ पार करून पैठण मार्गे येणाऱ्या वाहनांना जागीच टर्न घेऊन शेवगाव-गेवराई मार्गावर यावे लागते. बुधवारी रात्री संत ज्ञानेश्वर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा एक डबल ट्राॅली ट्रॅक्टर येथून चढताना अवजड भारामुळे उतारावरून रिव्हर्स आला. यावेळी मागील एक ट्राॅली तोल जाऊन नजीकच्या बाळासाहेब भगवान गोरे यांच्या सलून दुकानावर उलटली. त्यावेळी दुकानात ग्राहकांच्या दाढी-कटींगचे काम सुरू होते. दुकानाचे समोरील पत्राशेड पूर्णतः उसाखाली दबले गेले. शटर मोडून आतील प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या. शेजारील टेलिफोनचा खांबही वाकला, तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या बाळासाहेब गोरे, दिनकर खोले, मुजीम सय्यद यांच्या तीन मोटरसायकलींचा उसाच्या ट्राॅलीखाली चेंगरून चुराडा झाला. दरम्यान, ट्रॅक्टरसह डबल ट्राॅली चढावरून मागे येत असल्याचे लक्षात येताच आरडाओरडा झाल्याने नजीकचे लोक दूर पळाले. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस काॅन्स्टेबल उमेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी रात्री उशिरा घटनेतील ट्रॅक्टरसह मोटरसायकली ताब्यात घेतल्या.

-----

अपघातांचे दुर्लक्षित ब्लॅक स्पाॅट..

शेवगाव-गेवराई मार्गावरील हातगाव फाटा, बन्नोमाँ दर्गा परिसर, डाक बंगला चौक, काळा ओढ्यावरचा पूल, सोनविहीर फाटा, ठाकूर पिंपळगाव येथील धोकादायक वळण आदी ठिकाणे अपघातांचे ब्लॅक स्पाॅट बनलेले असून, येथे अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे; मात्र अशा ब्लॅक स्पाॅटकडे संबंधित प्रशासनाचे वर्षानुवर्षे दुर्लक्षच होते.

फोटो ओळी २५ बोधेगाव शुगर

बोधेगाव येथील हातगाव फाट्यावरील सलून दुकानावर उलटलेली उसाची ट्राॅली व नुकसान झालेले सलून दुकान.