शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत विमानाची चाचणी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:51 IST

जगभरातून येणा-या साईभक्तांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुस-या दिवसापासून विमानसेवा सुरू होईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे़

ठळक मुद्देराष्ट्रपती येणार१ आॅक्टोबरला होणार भक्तार्पण

शिर्डी : जगभरातून येणा-या साईभक्तांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुस-या दिवसापासून विमानसेवा सुरू होईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे़.एअर इंडियाचे बहात्तर आसनी विमान मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावरून दुपारी सव्वाचार वाजता शिर्डीच्या दिशेने झेपावले. हे विमान केवळ पस्तीस मिनिटात शिर्डी विमानतळावर पोहचले. नंतर घिरट्या घालून ५ वाजून २ मिनिटांनी या विमानाची चाके शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवर स्थिरावली. या विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय विमान उड्डयन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर गुप्ता, विभागीय संचालक मुकेश भाटिया यांच्यासह चौदा जणांचा समावेश होता. राकेश शेट्टी व संदीप मेहरा या विमानाचे वैमानिक होते. सहा वाजता अधिकाºयांसह हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने झेपावले़ विमानतळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी विश्वस्त सचिन तांबे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, शिर्डी विमानतळाचे संचालक धिरेन भोसले आदींसह सरकारी अधिकाºयांची उपस्थिती होती...................................................    ट्रायल लँडिंगचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, हा मोठा योग आहे़ सुरूवातीला मुंबईहून चार, दिल्लीहून व हैदराबाद येथून  प्रत्येकी एक अशा सहा विमानांच्या फेºया सुरू होतील़ धावपट्टीच्या विस्तारानंतर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल.-राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर............................................... अनेक जागा बदलत व अडथळ्यांची शर्यत पार करीत हे विमानतळ पूर्णत्वास गेले़ तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याचे भूमिपूजन केले व संस्थानने पन्नास कोटींची मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी सकारात्मक भूमिका बजावली. काकडीवासीयांनीही मोठे योगदान दिले. आपल्यादृष्टीने हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.-राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते व विधानसभा सदस्य, शिर्डी.