कोपरगाव : शहरातील भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाने राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेस ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी आकाश आहेर, योगेश बोराडे, धीरज आगलावे हे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी ४८ हजारांची शिष्यवृत्ती प्रति विद्यार्थी मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुख सी. आर. रणदिवे, स्पर्धा परीक्षा प्रमुख डी. एम. चव्हाण तसेच मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या सर्वांचे स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष पद्माकांत कुदळे, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा विकास व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक बी.आर. बिरे, उपमुख्याध्यापिका एम.डी. राजेभोसले, पर्यवेक्षक बी.व्ही. माने यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
केबीपी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST