जामखेड : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत अरणगाव (ता. जामखेड) येथील श्री अरण्येश्वर विद्यालयाने घवघवीत यश मिळविले. विद्यार्थ्यींनी वनश्री बाळू मिसाळ हिने १८० पैकी १५४ गुण मिळवून जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळविला.
वैष्णवी मदन यादव ही विद्यार्थिनीही १२० गुण मिळवून या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. शासनातर्फे प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
अरणगाव येथील अरणेश्वर
विद्यालयाचे एकूण १९ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तन्वी नामदेव जगताप (११४ गुण), स्वप्निल बळीराम ढेपे (११२), शुभम भारत ढेपे (१०५), निरंजन काशिनाथ झिंजाडे (१०२) हे विद्यार्थी १०० हून अधिक गुणांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा या परीक्षेचा निकाल ९४.७४ टक्के लागला. विभाग प्रमुख बी. एम. चांगुळे, विषय शिक्षक एस. जी. मोमनी, व्ही. पी. निंबोरे, के. जी. बिरंगळ, एस. एस. शेळके, विद्यालयातील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट, पर्यवेक्षक एच. एन. कोल्हे, सर्व शिक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतुक केले.