शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सापासोबत स्टंटबाजी, युवकानं गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:19 IST

सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी(९ एप्रिल) सकाळी घराच्या समोर साप निघाला होता.

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील घटना

कर्जत(अहमदनगर): सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी(९ एप्रिल) सकाळी घराच्या समोर साप निघाला होता.बहिरोबावाडी-चिंचोली फाटा मार्गावरील आडाचे लवन जवळ असलेल्या लष्कर वस्तीवर राहणाऱ्या शिवाजी लष्कर यांच्या घरासमोर साप आढळून आला. तेवढ्यात शिवाजी लष्कर यांनी काठी हातात घेऊन सापाला हाताने पकडण्याची स्टंटबाजी सुरु केली. मोबाईलमध्ये चित्रीकरणही सुरु झाल्याने त्यांची स्टंटबाजी वाढत गेली. सभोवती कुटुंबातील तसेच शेजारील महिला-पुरुषांची गर्दी झाली तसे सापासोबतचे खेळ वाढत गेले. सापाच्या तोंडावर काठीने दाबून दुसºया हाताने तोंडालगत पकडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. सापाकडून हाताला वेटोळे घातले जात होते. ते भयानक दृश्य पाहणाºया महिलांच्या काळजाचे ठोके वाढवित होते. मात्र स्टंटबाजीने झपाटलेल्या युवकाच्या मनात फक्त सापाला तोंडाजवळ पकडण्याची इर्षा होती. साप विष बाहेर टाकतोय हेही तो युवक सर्वांना सांगत होता. तेवढ्यात सापाने त्याच्या हाताला कडाडून चावा घेतला. येथेच चित्रीकरण संपले आणि तीन तासाच्या आतच त्याची जीवनयात्राही संपून गेली.उपचारापूर्वीच झाला मृत्यूसापाने दंश केल्यानंतर उपस्थितांनी तत्काळ दवाखान्यात जा असे सूचित केले. तरीही त्याच्यातील स्टंटबाजीचा जोर कायम होता. मला काहीच होणार नाही असे म्हणत त्याने तेथेच वेळ घालवला. काही वेळानंतर विष रक्तात पसरु लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.आई व पत्नीचेही ऐकले नाहीसापाला पकडत असताना कुटुंबातील महिला आवरण्याचा प्रयत्न करीत होत्या. चावा घेतल्याची घटना घडताच लगेच दवाखान्यात जा, असा सल्लाही दिला आहे. मात्र त्याने कुटुंबीयांचेही ऐकले नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत