शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

By admin | Updated: October 20, 2016 01:38 IST

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़ जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणारे हजारो युवक दुपारी वाडीया पार्क येथे जमले़ तेथून हजारोंच्या संख्येने निघालेला स्पर्धा परीक्षार्थींचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सरकारावर संताप व्यक्त केला़ अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसमान्यांना मिळत नाहीत, तर दुसरीकडे सरकारने अघोषित बंदी आणली आहे़ त्यामुळे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे़ स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन आमचा हक्क आम्हाला देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली़ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला़ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़ सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ राज्यभरातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात़ पदवीचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारतात़ अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असते़ परंतु, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर होत नाही़ वेळापत्रक जाहीर झालेच, तर पदसंख्येत मोठी कपात करण्यात येते़ हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय असून, विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी महामोर्चा काढला असल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, नोकरभरतीतील पदसंख्येची कपात थांबवा, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी नेमणूक करणे बंद करा, सामान्य अध्ययन विषयाचा निकष राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे करा, नोकरीभरतीत पारदर्शकता आणावी, पदभरतीसाठी प्रतीक्ष ायादी तयार करा.४वाडिया पार्क येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व कोणत्या एकाने केले नाही़ हरीश वाघमळे, राहुल माने, हर्षल यादव, राहुल सुरसे आणि अलंकार वाघमोडे या पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले़