शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. १८) संपन्न झालेल्या बी. एड. छात्र प्रशिक्षणार्थींच्या ऑनलाईन निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे होते.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षप्रमुख प्रा. राजू शेख उपस्थित होेते.
कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःला सकारात्मक बनवावे लागेल. आव्हाने पेलताना तंत्रज्ञान आत्मसात करावे. बौद्धिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, आपण किती यशस्वी आहोत, याची जाणीव करून घ्यावी. भक्तिभाव जपता आला पाहिजे. सोबत संभाषणकौशल्ये, आणि शिस्त हे सर्व जीवनात असेल तर जसे वातावरण तशी आव्हाने पेलण्याची शक्ती निर्माण करू शकता, असेही प्रा. तांबाेळी म्हणाले. सोनल वाळे, पूजा शेळके या छात्र प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. कविता काटे यांनी केले. सूत्रसंचालन परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. नयना पंजे यांनी केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. विलास पांढरे यांनी आभार मानले.