कर्जत : शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कर्जत येथे बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेला विद्यार्थी व नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गुणगौरव समारंभ उपाध्यक्ष शिक्षक दिनेश खोसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
या कार्यक्रमासाठी भाजपचे अशोक खेडकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, सभापती मनीषा जाधव, दिलीप जाधव, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी लगड, विस्ताराधिकारी उज्ज्वला गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी जिल्हा सरचिटणीस सुनील मते, कार्याध्यक्ष संदीप तोरडमल, संपर्कप्रमुख दिनकर जेवे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब ढाकणे, धनंजय कारंडे, राहुरीचे तालुकाध्यक्ष चांगदेव काकडे, शेवगावचे तालुकाध्यक्ष संदीप कातकडे, विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.