शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या

By admin | Updated: February 28, 2017 17:01 IST

वीस लाखाच्या खंडणीसाठी तालुक्यातील निमगाव खलू येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय राजू पानवकर (वय १७) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

ऑनलाइन लोकमतश्रीगोंदा, दि. 28 - वीस लाखाच्या खंडणीसाठी तालुक्यातील निमगाव खलू येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय राजू पानवकर (वय १७) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री घडली.या प्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निमगाव खलू येथील दोन अल्पवयीन मुले, तसेच त्यांचे साथीदार अमोल कोकरे (खराडेवाडी, ता. बारामती) अजय मांढरे (रा. उंडवडी. ता. बारामती) व वैभव होले (रा. पारवडी. ता. बारामती) या पाचजणांना अटक केली. यात आणखी एकजण फरार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव खलू येथील हे दोन्ही अल्पवयीन आरोपी गावात मोलमजुरी करीत होते. या कामातूनच त्यांची इतर आरोपींशी ओळख झाली होती. रोजच्या मोलमजुरी व कष्टाच्या कामाला कंटाळून त्यांनी खंडणी वसुलीची शक्कल लढवली. निमगाव खलूमध्ये राजू पानवकर यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांचा मुलगा अक्षय याचे अपहरण करण्याचा डाव सहाही आरोपींनी रचला. शनिवारी (दि. २५) संध्याकाळी अल्पवयीन आरोपींनी अक्षयला मोटारसायकलवर बसवून पाटस (ता. दौंड) शिवारातील एका पडक्या बंगल्यात नेले. तेथे आधीच अमोल, अजय, वैभव व आणखी एक असे चौघे हजर होते. अक्षयच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडून २० लाख रूपये खंडणी घेण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी अक्षयला मारहाण केली. झटापटीत अक्षयच्या डोक्यात एक उर्मी घाव बसला. त्यातच तो गतप्राण झाला. अक्षयचा मृतदेह तेथेच टाकून आरोपी आपापल्या गावाकडे पळून गेले. निमगाव खलू येथील दोघे अल्पवयीन आरोपीही गावाकडे निघून आले. रविवारी सकाळी अन्य चार आरोपींनी अक्षयच्या नातेवाईकांना खंडणीसाठी संपर्क केला. अक्षयचे मामा संदीप ढमे यांनी अक्षयच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली. अमोल, अजय व वैभव हे तिघे आरोपी अक्षयच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते. दुसरीकडे खंडणीसाठी ज्या क्रमांकावरून फोन येत होता, तो क्रमांक ट्रेस करून पोलीस आरोपींच्या मागावर होते. परंतु पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. कारण गावातून हे अल्पवयीन आरोपी त्यांना पोलिस व गावकऱ्यांच्या हालचालीची इत्यंभूत माहिती देत होते. दरम्यान, संशय बळावल्याने सोमवारी पोलिसांनी गावातील अल्पवयीन आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यात त्याने आरोपींशी संपर्क केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी सापळा लावून अन्य आरोपींनाही त्यांच्या गावात जावून अटक केली. अजून एक आरोपी फरार आहे. दोन महिन्यांपूर्वीच रचना प्लॅनसहाही आरोपी बांधकाम मजूर होते. सेंट्रिंगची कामे ते करीत होते. रोजच्या कष्टाच्या कामाला कंटाळून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी हे अपहरण नाट्य रचले. एखाद्या सराईत गुन्हेगारांसारखी तयारी त्यांनी केली होती. या अपहरणनाट्यासाठी त्यांनी १५ दिवसांपूर्वी नवीन सीमकार्ड, नवीन मोबाईल खरेदी केला होता. निमगाव खलूत तणावअक्षय पानवकर हा दौड येथील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे निमगाव खलूमध्ये तणाव होता. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटोळे, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी सखोल तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी निमगाव खलू येथे अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.