शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत पाण्यासाठी ठिय्या; महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले रिकामे हंडे

By admin | Updated: May 24, 2017 13:44 IST

महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.

आॅनलाईन लोकमतपाथर्डी, दि़ २४ - तालुुक्यातील अकोला गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी सकाळी अचानक अकोला गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात सुमारे चार तास ठिय्या दिला. महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. या आंदोलनाचे नेतृत्व पाथर्डी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सरपंच पुष्पा गर्जे, उपसरपंच नारायण पालवे यांनी केले. अकोला गावात तीव्र पाणी टंचाई असल्याने पाणी कोठून आणावे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. अकोला गावाला टँकरने पाणी मिळावे, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे १४ मे रोजी सादर केला होता. पंचायत समिती प्रशासन व तहसील प्रशासनाने सदर प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला़ परंतु अद्याप टँकर मंजूर न झाल्यामुळे बुधवारी सकाळीच गावातील महिला व पुरूष तहसीलदारांच्या दारात आले व त्यांनी ठिय्या दिला.आंदोलनात आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, उद्धव माने, अ‍ॅड. संपत गर्जे, जमुना पंडित, मीना भागवत, सुरेखा गर्जे, सुलोचना गोसावी, तैनूर सय्यद, मीना गिरी, मीना भाबड, पद्मबाई गोसावी, नंंदा गोसावी, गणपत गर्जे, संभाजी गर्जे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या सहभागी झाले होते.