शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्राँगरूमला थ्री टायर सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक शाखा, पोलीस यंत्रणा, तसेच संबंधित उमेदवार निवांत झाले असले तरी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेत मात्र २४ तास खडा पहारा सुरू आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक शाखा, पोलीस यंत्रणा, तसेच संबंधित उमेदवार निवांत झाले असले तरी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँगरूमच्या सुरक्षेत मात्र २४ तास खडा पहारा सुरू आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफ व जिल्हा मुख्यालयातील पोलीस अशा ‘थ्री टायर सुरक्षे’त (७५ जवान) ही स्ट्राँगरूम बंदिस्त झाली आहेत. तब्बल २५ राजपत्रित अधिकारी टप्प्याटप्प्याने यावर देखरेख करीत असून, जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून सकाळ-संध्याकाळ पाहणी केली जात आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २३, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघातील मतदान यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली. २३ मे रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत या मतदान यंत्रांची काळजी घेतली जात आहे. स्ट्रॉँगरूमच्या सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याचे मॉनेटरिंग गेटवर ठेवण्यात आले आहे. ते संबंधित राजकीय पक्षांनाही पाहता येईल. प्रवेशद्वारावरच २४ तास व्हीडीओ शुटिंगची व्यवस्था करण्यात आली असून येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. कर्मचाºयांसाठी भोजन घेऊन येणारे केटरर्स, साफसफाई कामगार, तसेच दिवसभरात कोणी अधिकारी येणार असेल तर सर्वांची चौकशी होते, तसेच त्याचे शुुटिंग केले जाते.विविध विभागातील तब्बल २५ राजपत्रित अधिकाºयांची या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली असून, एकेक करून प्रत्येक अधिकारी आठ तास येथे ठाण मांडून असतो. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे व संबंधित सहायक निवडणूक अधिकारी सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतात.अग्नीशमन यंत्रणाही येथे २४ तास सज्ज आहे.१५ हजार यंत्रेअहमदनगर मतदारसंघात दोन हजार, तर शिर्डी मतदारसंघात १७०० मतदान केंद्रे होती. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट व एक व्हीव्हीपॅट असे चार यंत्रे होती. प्रत्यक्ष मतदानावेळी अनेक यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे ही सर्व मिळून सुमारे १५ हजार यंत्रे स्ट्राँगरूममध्ये बंदिस्त आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर