शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील पिढी वाचविण्यासाठी दारुची बाटली आडवी करा

By admin | Updated: July 27, 2016 00:44 IST

निघोज : दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जर दारुची दुकाने अशीच चालू राहिली तर पिढी बरबाद होईल. भविष्यातील पिढी वाचवण्यासाठी

निघोज : दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जर दारुची दुकाने अशीच चालू राहिली तर पिढी बरबाद होईल. भविष्यातील पिढी वाचवण्यासाठी निघोजमधील दारुची बाटली आडवी करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.पारनेर तालुक्यातील निघोज येथे रविवारी दारुबंदीसाठी मतदान होणार असून दारुबंदीच्या प्रचाराचा शुभारंभ अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला. मळगंगा मंदिरासमोरील सभेत ते बोलत होते. अण्णा हजारे म्हणाले, दारुमुळे राज्याला सुमारे २७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, त्याचा विचार शासन करीत आहे. परंतु लोणी मावळा, कोपर्डीसारख्या अत्याचाराच्या घटना घडत असताना त्यामुळे होणारे नुकसान तुम्ही पैशात भरून काढू शकणार नाही. दारुमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. खेड्यातील कायदा, सुव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत दारुबंदी होेणेच महत्वाचे असून आपण यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे म्हणाले, निघोजमधील महिलांनी उभारलेली चळवळ ही क्रांतीची चाहूल असून महिलांनी आता मतदानासाठी निर्भयपणे बाहेर पडावे, असे आवाहन केले. तर निघोजमधील दारुबंदी निवडणुकीत चिन्ह मतपत्रिकेवर घेण्यास नकार देण्याचा आपण निषेध करीत आहोत. निघोज परिवाराचे मार्गदर्शक बाबाशेठ कवाद म्हणाले, कुटुंब व्यवस्था चांगली राहण्यासाठी व निघोज गावचा संस्कारीत विकास होण्यासाठी महिलांनी दारुबंदीसाठी मतदान करावे. यावेळी बबनराव कवाद यांनी दारुबंदीसाठी आता शेवटची लढाई असून ही निवडणूक होऊ नये म्हणून दारू दुकानदार अनेक अडथळे आणत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अमृता रसाळ, सरपंच ठकाराम लंके, एकनाथ पठारे, संजय वाघमारे, कांता लंके, पुष्पा वराळ, पूजा रसाळ, मनिषा घोगरे, छाया लामखडे, जया ढवळे, भावना साळवे, शैला खराडे, सिध्दी लामखडे, ज्ञानेश्वर कवाद, भास्कर कवाद उपस्थित होते. (वार्ताहर)