शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी आमदारांचा विधानभवनाच्या पाय-यांवर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:29 IST

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

अहमदनगर : जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. नगर जिल्ह्याचे विभाजन करावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.नेवासा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, कोपरगाव मतदार संघाच्या आमदार स्नेहलता कोल्हे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, पारनेरचे आमदार विजय औटी, श्रीगोंदयाचे आमदार राहुल राजळे, श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार वैभव पिचड आदींनी यावेळी घोषणाबाजी करत नगर जिल्ह्याच्या विभाजनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यावेळी उपस्थित होत.सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी वरील सर्व आमदारांच्या वतीने जिल्हा विभाजनाच्या संदर्भातील सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दले. त्यानंतर विधानभवनात जाणा-या सर्व आमदाराकडेही या संदर्भात पाठींबा द्या, अशी मागणी केली.सद्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये जिल्हा विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर यावा व तो लवकरात लवकर सुटावा म्हणून नगर जिल्ह्यातील आमदारांनी आज विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर