शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस कोटी रुपयांच्या कामांची स्थगिती उठविली

By admin | Updated: April 22, 2016 00:16 IST

अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे,

अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे, अशी माहिती महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करा, अशी सूचना ही स्थगिती उठविताना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक मूलभूत सोईसुविधा योजनेंतर्गत नगर महापालिकेला शासनाने वीस कोटी रुपयांचा निधी दिला. तितकाच निधी महापालिकेला टाकून शहरात चाळीस कोटी रुपयांची कामे करावयाची आहेत. चाळीस कोटी रुपयांच्या निधीतील कामांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र त्यानंतर युतीच्या नगरसेवकांनी फेज टू पाणी योजनेसाठी रस्ते खोदाई होणार असून ही खोदाई झाल्यानंतरच हा निधी खर्च करावा. तोपर्यंत निधीतील कामे करू नये अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने चाळीस कोटी रुपये निधी खर्चास स्थगिती दिली होती. आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर यांनी मुंबईत गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाळीस कोटी रुपयांतील प्रस्तावित कामे होणे कसे गरजेचे आहे, हे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चाळीस कोटी रुपयांच्या कामांना दिलेली स्थगिती उठविण्याचे आदेश दिले. फेज टू पाणी योजनेच्या कामांचा या निधीतून प्रस्तावित कामास अडथळा येत नाही, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)चाळीस कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी देण्यात अडचणी येत असतानाच निधी खर्चाची मुदत संपली होती. त्यामुळे शासनाकडे महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. तो विषयही महापौर कळमकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना उपस्थित केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा निधी खर्च करण्यास आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे आदेश नगरविकास विभागाने काढले असून ते ई-मेलद्वारे महापालिकेला पाठविले असल्याचे कळमकर म्हणाले.