शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वा..! याला म्हणतात भूतदया; बस थांबवली, पक्ष्याला वाचवले

By शेखर पानसरे | Updated: October 1, 2023 14:58 IST

मांजात अडकलेल्या पक्ष्याला बसवर चढून दोर टाकून जीवदान

संगमनेर : ( अहमदनगर) संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षाला चायनीज मांजा अडकला होता, त्या मांजात पंख अडकलेल्या साळुंकी पक्ष्याला तरुणांनी जीवदान दिले. झाडाला फार उंचावर पक्षी अडकला होता, तिथपर्यंत दोर जात नव्हता. त्यामुळे बस थांबवून तिच्या टपावर चढून दोर टाकून पक्ष्याला वाचविण्यात यश आले.शनिवारी (दि. ३०) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपळ वृक्षाला अडकलेल्या चायनीज मांजात साळुंकी पक्ष्याचे पंख अडकल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. हा पक्षी मांजातून स्वताला सोडविण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पक्ष्याच्या पंखाला मांजाचा विळखा पडल्याने त्याला त्यांची सुटका करून घेता येत नव्हती. त्यावेळी दत्तात्रय भुजबळ, मल्हार भुजबळ, मनोज भोपे, अभिजीत लहामगे यांसह ओंकार थोरात, गणेश ठोंबरे, पंकज वाघ, आशिष कोऱ्हाळकर यांनी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पक्षी झाडाला उंचावर अडकल्याने त्याला काढणे अवघड काम होते. त्याचवेळी एका दुचाकीला बांधलेला मोठा दोर काढून तो मांजावर टाकून पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, दोर तिथपर्यंत जात नसल्याने बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसला थांबविण्यात आले. ओंकार थोरात हा बसच्या टपावर चढला, त्याने मांजावर दोर फेकून पक्षाला अलगद खाली काढले. पक्ष्याचे पंख मांजात अडकून तो जखमी झाल्याने त्याला उडता येत नव्हते. त्यामुळे हेल्पिंग हँण्डस् युथ ऑर्गनायझेशन या प्राणी, पक्षी, भटकी जनावरे, सर्प यांच्यासाठी कार्य करणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भूषण नरवडे यांना याबाबत कळविण्यात आले. नरवडे यांनी तातडीने येऊन पक्षाला ताब्यात घेतले, पुढील उपचारांसाठी ते त्याला घेऊन गेले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर