शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत अतिक्रमण हटवण्यासाठी रास्ता रोको : पोलिसांचा लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:38 IST

तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला.

पाथर्डी : तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला.शहरात तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती, शहरातून जाणा-या महामार्गालगतची तसेच शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर अतिक्रमणे करून टप-या उभारण्यात आल्या आहेत. दोन दिवस उलटूनही महसूल, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून वेळीच कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत शेवगाव रोडवर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी तसेच इतर पोलीस फौजफाटा तात्काळ हजर झाला. यावेळी नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना धारेवर धरत शहरातील सर्वच अतिक्रमणे काढण्याची जोरदार मागणी केली. वेळीच तोडगा न निघाल्याने गेल्या दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरु होते. यावेळी अतिक्रमण धारक आदिवासी महिलांनी पोलिसांवर आक्रमक चाल केली. यामुळे पोलिसांनी देखील गर्दी पांगवण्यासाठी सौम्य स्वरूपाचा लाठी मार केला. यावेळी अतिक्रमित भागात मुरूम टाकणा-या एक टिपर वाहन अडवून महिलांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होणा-या अतिक्रमणाच्या मुद्यावरून शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी