अकोले : शहर व तालुक्यात कडकडीत बंद पळून मराठा आंदोलन करण्यात येत आहे. कळस, इंदोरी, रुंभोडी, देवठाण, औरंगपूर, अंबड येथून रॅली काढत आंदोलनकर्ते अकोलेत दाखल झाले.त्यानंतर अकोले शहरातून भगवी रॅली काढण्यात आली. कोल्हार घोटी राज्य मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आमदार वैभव पिचड यांनी आंदोलनात हजेरी लावत मराठा आंदोलनास पाठिंबा दिला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, कैलास वाकचौरे, भास्कर कानवडे, कॉम्रेड रामनाथ चौधरी, डॉ.अजित नवले, डॉ.संदीप कडलग, प्रकाश नवले, बबनराव महाले, शर्मिला येवले, सेनेचे मच्छिंद्र धुमाळ, सतीश भांगरे, सोनाली नाईकवाडी सहभागी झाले होते.
अकोले तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 12:48 IST