शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 18:48 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखावे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कोपरगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसण्यापासून रोखावे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. उमेदवार संजय सुखदान, वंचित बहुजन आघाडीचे नेते मोठ्या संखेने उपस्थित होते.अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, मागील तीन वेळा काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार शिर्डी मतदारसंघात निवडून आले नाहीत. रामदास आठवले यांचा पराभव देखील यांनीच केला. असे सांगून राजकारणातील पळपुटेपणा राहुल गांधी बारामतीतून शिकले की काय? अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदी व नोटा बदलीचा निर्णय देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा ठरला. प्रत्येक गोष्टीला जसा अंत असतो, तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजकीय अंत होणार आहे. त्यांना लवकरच 'अलविदा......मोदी' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इथल्या सुशिक्षित, अनुभवी व जाणकार लोकांनी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. ही लोकसभा निवडणूक म्हणजे गेल्यावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019