शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘पालावर राहणं.. रानात भटकणं.. पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं नकोस झालयं साहेब; नगरमध्ये पारधी समाजानं पोलिसांमोर मांडली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:36 IST

‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय.

ठळक मुद्देजिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने रविवारी पारधी समाजातील तरूणांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसह त्यांचे कुटुंबीयही मेळावास्थळी उपस्थित होते.एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मिळेल ती नोकरी करण्याची तयारी आहे ’ अशी भावना पारधी समाजातील तरूण, तरूणी आणि त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.त्यांना मेळाव्यात जॉब कार्ड देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांत त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. 

अरूण वाघमोडेअहमदनगर : ‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मिळेल ती नोकरी करण्याची तयारी आहे ’ अशी भावना पारधी समाजातील सुशिक्षित तरूण, तरूणी आणि त्यांच्या आई-वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने रविवारी पारधी समाजातील तरूणांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसह त्यांचे कुटुंबीयही मेळावास्थळी उपस्थित होते.पिंपळवाडी (कर्जत) येथील नववी शिकलेला वालचंद काळे तर आठवी शिकलेली त्याची पत्नी शुभांगी मेळाव्यात सहभागी झाले होते. शिक्षण घेता आले नाही. आहे त्या शिक्षणावर नोकरी करण्याची इच्छा आहे. इतर ठिकाणी कायमस्वरूपी काम मिळत नाही. असे मत त्या दाम्पत्याने व्यक्त केले. वालचंद याचे वडील शशिकांत व आई कलावती म्हणाले, आमचे आयुष्य कसे तरी कडेला गेले़ आमच्या मुलांना काम मिळून त्यांना मानाने जगता यावे अशीच इच्छा आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेतलेल्या नोकरी मेळाव्यातून मिळालेली नोकरीची संधी आमच्यासाठी आधार ठरेल.रेखा चव्हाण, यशोदा काळे, प्रियंका शिंदे, अगीना भोसले, पूजा चव्हाण, सतीश काळे, अनिल चव्हाण हे नववी-दहावी शिकलेले तरूण-तरूणी मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यांना मेळाव्यात जॉब कार्ड देण्यात आले.या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांत त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. बाहेर जाऊन काम करून कुटुंबाला हातभार लावण्याची आमची इच्छा आहे. आमच्या समाजातील अनेक तरूण मुले आहे त्या शिक्षणावर मिळेल तेथे काम करतात. कितीही अडचण आली तरी गुन्हेगारीकडे वळणार नाही अशी भावना या मुलांनी व्यक्त केली.जॉब कार्डचे वाटपमेळाव्यात आलेल्या तरूणांना जॉब शोकेसच्यावतीने जॉब कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सदर तरूणांना वर्षभरात विविध कंपन्यात नोकरीची संधी मिळणार आहे.पहिल्यांदाच आमचा विचार केलापोलिसांचे आणि आमचे नाते खूप जुने, पण ते वेगळ्या कारणासाठी. आज मात्र पोलिसांनी आमच्या मुलांना मानाने बोलावून त्यांच्या भविष्यासाठी चांगला उपक्रम घेतला. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच आमचा विचार कुणी तरी केला असे मत उत्तम चव्हाण, कृष्णा तांदळे, साखराबाई चव्हाण या ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहणा-या पारधी समाजाला इतर समाजाने स्वीकारून त्यांच्याविषयीची भावना आता बदलावी असे मत यशोदा चव्हाण (बेलवंडी कोठार) व सतीश काळे (गेवराई) सुशिक्षित मुलांनी व्यक्त केली.११२० मुलांना मिळाली नोकरीपरिक्षेत्रीय नोकरी मेळाव्यात पोलीस पाल्य व पारधी समाजातील एकूण ३२०० मुलांनी सहभाग घेतला होता. यापैकी ११२० मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे. १४४० मुलांची दुय्यम निवड फेरीसाठी नियुक्ती झाली आहे. रविवारी निवड झालेल्यांपैकी ८० मुलांना मेळावास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात एकूण ५२ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस