शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिलाच भाजीपाला प्रकल्प

By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST

बाभळेश्वर: शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली़

बाभळेश्वर: पणन विभागाच्या वतीने निर्यात सुविधा, निर्जलीकरण, पॅक हाऊस, प्रिकुलिकंग आणि शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली़ राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे राज्यातील पहिला प्रकल्प उभारण्यात आला असल्याचेही ते म्हणाले़ पत्रकार परिषदेत मंत्री विखे म्हणाले, जिरायत भागातील शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे़ पणन मंडळामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रवरा फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या पाच एकरावर या प्रकल्पामध्ये फळभाजीपाला प्रक्रिया आणि उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे फलोद्यान प्रशिक्षण उपकेंद्र येथे असणार आहे़ ११ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. याच ठिकाणी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे यांच्या वतीने फलोद्यान प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे़ या अंतर्गत येथे दहा एकर क्षेत्रावर एक हजार लक्ष रूपये खर्च करून सर्व सुविधायुक्त शेतकऱ्यांना शेतीचे हायटेक तंत्रज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे़ पाच एकरावर तीन शेडनेट हाऊस, पाच पॉलीहाऊस, एक फॅन पॅड पॉलीहाऊस आणि तीन पॉलीहाऊस टनेल असे बारा हरीतगृह व्यावसायिक तत्वावर उभारून त्याद्वारे दरवर्षी दोन हजार ४०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़, असेही विखे यांनी सांगितले. खडकेवाके प्रकल्पातून उत्पादित पदार्थांना ‘प्रवरा ग्रीज’हे नाव देण्यात आले आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठप्रकल्पामुळे दिवसाला ४० टन मालाची एक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होईल़ सर्व प्रतीच्या मालाला एकाच छताखाली खरेदी केंद्र उपलब्ध होईल़ प्रकल्पामुळे कृषि मालास हमीभाव आणि कंत्राटी शेतीतून पॉलिहाऊस, शेडनेटसारख्या शेतीला चालना मिळेल़ फळे, भाजीपाल्याच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानामुळे मुल्यवृद्धी प्रकल्पामुळे ४० जणांना थेट तर २०० पेक्षा जास्त जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल़ शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल़रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा होणार आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ बाळासाहेब विखे राहतील़ कृषि मंत्री राधाकृष्ण विखे, आदीवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, राज्यमंत्री सुरेश धस, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ़ सुधीरकुमार गोयल, पणनचे कार्यकारी संचालक मिलिंद भाकरे, भाजीपाला संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आदींची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे़