असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, डॉ. बाबासाहेब दिघे, बाळासाहेब कोल्हे, बाळकृष्ण गांडाळ, बबन खेमनर आदी यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संसद भवनला घेराव घालण्यात आला होता. त्या समर्थनार्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉर्डिनेटर डॉ. ममता सी. एस., राष्ट्रीय रिजनल कॉर्डिनेटर मुकेश डागर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्हा व तालुका स्तरावर शहरी रोजगार गॅरंटी कायदा अंमलात आणावा. मनेरगामधील माफियागिरी संपुष्टात आणावी. प्रवासी बस व कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी. असंघटित कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यात यावी. असंघटित कामगार महामंडळात कामगारांची नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करावी. केंद्र सरकारने केलेले कामगारविरोधी कायदे तातडीने रद्द करावेत, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.