शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडीला ३० पेक्षा अधिक जागा मिळतील - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:26 IST

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.

राहुरी : पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत. विदर्भात भाजपाची ही अवस्था असेल तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या ३० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.कणगर येथे बुधवारी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, रोहिदास कर्डिले, सुरेश वाबळे, डॉ.उषाताई तनपुरे, बाबासाहेब भिटे, अजित कदम, मनिषा ओहोळ, बाळासाहेब लटके, नंदा गाढे, अ‍ॅड.शारदा लगड, प्रमिला कोळसे, सुयोग नालकर उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले, मोदींनी सामान्य जनतेला फसवले. इतिहासातील उच्चांकी बेरोजगारी झाली. उरी, पठाणकोट, पुलवामा असे मोठे हल्ले देशावर झाले. कुणीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. उलट सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. निवडणुकीनंतर एनडीएमधील काही घटकपक्ष शरद पवार यूपीएमध्ये आणतील. पंतप्रधानपद जाईल, या भीतीने मोदी राष्ट्रवादी व पवार यांच्यावर टीका करीत आहेत. यूपीए सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना पवार यांच्या व्याख्येतील सरसकट कर्जमाफी दिली जाईल. चार महिन्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल. निळवंडे कालव्याची कामे पूर्ण करू. स्व. शिवाजी गाडे यांनी सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नका, असे सांगितले होते. संग्राम जगताप यांचा विजय पक्का आहे, असेही पाटील यांनी सांगितले.आमदार आव्हाड म्हणाले, मोदी यांच्या सभेनंतर फिरणाºया तीन क्लिपमुळे नगरकरांना शरमेने मान खाली घालावी लागली. नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा आहे. शेतकरी आत्महत्या, पाच वर्षात काय केले. यावर मोदी बोलत नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष वाढविला. देशाच्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, पुलवामा घटनेत ३५० किलो आरडीएक्स कुठून आले. याचे उत्तर देत नाहीत. मोदींचा पराभव केला नाही तर हिटलर पुन्हा जन्माला येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दादासाहेब पवार, अजित कदम, अ‍ॅड.पंढरीनाथ पवार, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे झाली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019