शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

By admin | Updated: October 2, 2024 15:42 IST

अहमदनगर : वाडियापार्क येथील जलतरण तलावावर येत्या शनिवारपासून पहिली राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा होत असून, स्पर्धेत राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़

अहमदनगर : वाडियापार्क येथील जलतरण तलावावर येत्या शनिवारपासून पहिली राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा होत असून, स्पर्धेत राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़ ही स्पर्धा २७४ गटांत होणार असल्याची माहिती नगर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़नगर शहरात प्रथमच जलतरण स्पर्धा होत आहे़ वाडियापार्क येथील जलतरण तलावावर पहिली राज्यस्तरीय स्पर्धा राज्य आणि जिल्हा जलतरण संघटना आणि मास्टर्स अ‍ॅक्वेटिक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अनिल कवडे, आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन होणार असल्याचे घुले म्हणाले़ ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे़ या स्पर्धेसाठी राज्यातील ३० जिल्ह्यातील ४८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे़ वयोगट २५ ते ९२ वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेत फ्रिस्टाईल स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय, स्ट्रोक, वैयक्तिक मिडले, रिले आणि डायव्हींग यांचा समावेश असणार आहे़ स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय मानांकित खेळाडूस अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदक प्रदान केले जाणार आहे़खेळाडूंसह अधिकाऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले़ कॅप्टन गजानन चव्हाण, रामदास ढमाले आणि रावसाहेब बाबर पत्रकार परिषदेस उपस्थित होते़(प्रतिनिधी)